
कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांची फी सवलत कायम ठेवावी ः आ. संजय कदम यांची मागणी
रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना पूर्वी असलेली फी मधील सवलत कायम ठेवावी अशी मागणी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. संजय कदम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी कुलगुरू डॉ. संजय सावंत यांना पत्र पाठविले असून त्यामध्ये त्यांनी या विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत व शुल्क प्रतिपुर्ती योजना पूर्वीप्रमाणे कायम ठेवावी व त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे. जर ही सवलत रद्द केली तर अनेक गरजु विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागेल असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com