
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायणराव राणे विधानसभा निवडणूक लढवणार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायणराव राणे हे कुडाळ मालवण मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे याबाबत राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात तसा सूतोवाच केला आहे यामुळे विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून नारायणराव राणे विरुद्ध शिवसेनेचे वैभव नाईक ही तुल्यबळ लढत होईल असा अंदाज आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायणराव राणे यांचा पराभव करून राणे यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते यामुळे या निवडणुकीत राणे वचपा काढणार का याकडे जनतेचे लक्ष लागून आहे या मतदार संघातून स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत हेदेखील इच्छुक आहेत मात्र राणे कुटुंबियांपैकी कोणीही उभा राहत नसेल तरच आमच्या नावाचा विचार व्हावा अशी त्यांची भूमिका आहे.
www.konkantoday.com