
जिल्हा परिषदेच्या इमारतीवर महाऊर्जा बसविणार सौर युनिट
राज्यात सध्याच्या विजेचा वापर कमी करून सौरउर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर विनाशुल्क सौर पॅनल बसवण्याचा निर्णय महाऊर्जाने घेतला आहे. याबाबत नुकतीच महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अचल गोयल यांची भेट घेऊन या प्रकल्पाची माहिती दिली. केंद्र शासनाकडून हा महाऊर्जा विभागामार्फत विनाशुल्क सौर युनिट बसवण्यात येणार असूनराज्यात निवडण्यात आलेल्या विकासकामार्फत हा खर्च केला जाणार आहे या प्रकल्पाला मान्यता मिळाली मिळाल्यानंतर लवकर अंमलबजावणी केली जाणार आहे.
www.konkantoday.com