
चिरेखाण व्यावसायिकांवर आकसाने कारवाई ,अशोक जाधव यांचा आरोप
वर्षाच्या सुरुवातीलाच चिरेखाणीचा परवाना देऊन टप्प्या टप्प्याने रॉयल्टी भरून घ्यावी अशी मागणी चिरेखाण व्यवसायिकांची असताना देखील प्रशासनाकडून मात्र याची अंमलबजावणी न करता चिरेखाणीचे मापे घेऊन नाहक दंड चिरेखाण व्यावसायिकांना बसवून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा आरोप जिल्हा चिरेखाण संघटनेचे संस्थापक अशोक जाधव यांनी केला आहे. चिरेखाण व्यवसायिकांची पहिली रॉयल्टी शिल्लक असतानाच मुदत संपल्यानंतर नव्याने रॉयल्टी भरायची सक्ती केली जाते ही सरसकट लूट असल्याचा आरोप जाधव यांनी केला.
चिरेखाण व्यावसायिकांना वर्षभराची एकदाच परवानगी द्या व दंडात्मक कारवाई करू नका या मागणीचे निवेदन चिरेखाण व्यावसायिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
www.konkantoday.com