कोयनेचे वाया जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी सर्वेक्षण
कोयनेचे अतिरिक्त पाणी समुद्रात वाया जाते या पाण्याचा उपयोग जिल्हाभरात करावा अशी मागणी अनेक वर्ष होत आहे. मात्र हा प्रकल्प खर्चिक आहे असे सांगून शासनाने त्याबाबत उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे कोयनेचे पाणी वाया जात होते. आता कोयनेचे वाया जाणारे पाणी वापरता येईल का आणि कुठे नेता येण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार असून सर्वेक्षणाचे काम वाप क्रॉस या संस्थेला देण्यात आले आहे.मध्यंतरी हे पाणी पश्चिम महाराष्ट्राकडे वळवण्याचा विचार सुरू होता परंतु कोयनेचे वाया जाणारे पाणी आधी जिल्ह्यात फिरवावे व पाणी शिल्लक राहिल्यास ते अन्य भागात न्यावे अशी कोकणवासियांची मागणी आहे नेमण्यात आलेली संस्था सर्वेक्षण करून त्याचा अहवाल शासनाला दिल्यानंतर याबाबत निर्णय होणार आहे.
www.konkantoday.com