
सिंधुदुर्गातून बुलेट चोरून नेणाऱे दोन जण पोलिसांच्या जाळ्यात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बुलेट चोरून त्या मुंबई येथे नेणाऱ्या दोन जणांच्या टोळक्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत .मुळचे सिंधुदुर्गातील राहणारे जयप्रकाश चिंदरकर व विशाल नाईक या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या दोन दिवसात सिंधुदुर्गातून बुलेट गाड्या चोरीला जाण्याचे प्रकार घडले होते. त्याबाबत पोलिसांकडे चोरीच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. राजापूर पोलिसांचे पथक रात्री गस्त घालत असताना रात्री साडेतीनच्या सुमाराला दोन बुलेटस्वार येताना दिसले. पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली.परंतु त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे मिळाली नसल्याने पोलिसांना संशय आला त्यांनी अधिक चौकशी केली असता या दोघांच्या टोळक्याने सिंधुदुर्गातून गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाले. यातील आरोपी मूळचे सिंधुदुर्गमधील असले तरी सध्या ते मुंबई विरार येथे राहतात. त्यामुळे सिंधुदुर्गातून गाड्या चोरून मुंबई ते विकण्याची टोळी असावी असा पोलिसांचा संशय आहे.
www.konkantoday.com