रिफायनरी समर्थकांचा आज मोर्चा ,तर विरोधकांचे विरोध करण्यासाठी डावपेच
नाणार येथे रिफायनरी प्रकल्प परत यावा यांच्या समर्थनार्थ आज रत्नागिरीत भव्य मोर्चा निघत आहे या प्रकल्पाला विरोध असणाऱ्या विरोधकांकडून मात्र अचानक विरोध करण्याचे डावपेच आखले जात असल्याचे वृत्त आहे पोलिसांनी या आधीच विरोधकांच्या प्रति मोर्चाला परवानगी नाकारली आहे यातून कायदा व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी प्रांतांनी रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम भूमिकन्या एकता मंचच्या सोनाली ठकरूल, तन्वी माेडे,नेहा दूसण कर ,संजय राणे यांना२०जुलै रोजी रत्नागिरी तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई आदेश बजावण्यात आला आहे असे असले तरी विरोधकांकडून आयत्या वेळी कोणतीही विरोधाची घटना होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यासाठी तिनाशे पोलीस शिघ्रकृती दल एसआरपी व राज्य राखीव दलाची तुकडी यांच्यामार्फत चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
www.konkantoday.com