रत्नागिरी जिल्ह्यातील ८१ अनधिकृत धार्मिक स्थळे अधिकृत करण्याचा शासनाचा निर्णय -आमदार उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय जागांवरअनधिकृत असलेल्या धार्मिक स्थळांना आता नियमित करून अधिकृत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी दिली यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील देवळे मशिदी मिळून ८१ धार्मिक स्थळांचा समावेश आहे त्यामध्ये डीएसपी निवासस्थानाजवळील बौद्ध विहार ,कुवारबाव साईनगर येथील साई मंदिर पोलीस जिल्हाधिकारी कार्यालयातील महापुरुष मंदिर शिरगाव येथील जामा तून मुस्लिम धार्मिक स्थळ अशा रत्नागिरी तालुक्यातील३० देवळे व मशिदी यांचा समावेश आहे जिल्ह्यातील चिपळूण-४, दापोली-५, मंडणगड-३, खेड-१४, राजापूर -५,संगमेश्वर-७, लांजा -६,गुहागर -४अशा धार्मिक स्थळांचा समावेश आहे आता या जागा ट्रस्टच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने महसूल खात्याकडून कार्यवाही सुरू आहे शासनाने हा निर्णय घेतल्याने या धार्मिक स्थळांना अधिकृत दर्जा प्राप्त झाला आहे त्यामुळे धार्मिक तेढ कमी होण्यास मदत होणार आहे.
www.konkantoday.com