
डेरवण येथील धरणात बुडून मुंबईच्या तरूणाचा मृत्यू
रत्नागिरी ः मुंबईहून सावर्डे येथे भाडे घेवून आलेल्या इनोव्हा चालकाचा डेरवण येथील धरणात बुडून मृत्यू झाला. डेरवण येथे मुंबईहून भाडे घेवून प्रशांत देवेंद्र शर्मा (रा. ठाणे) हा आपली इनोव्हा गाडी घेवून आला होता. तो व अन्य तिघेजण आंघोळीसाठी धरणावर गाडी घेवून गेेले होते. त्याचेबरोबर असलेले तिघेजण धरणाच्या पाण्याच्या पाटात उतरले. मात्र प्रशांत शर्मा हा गाडी घेवून धरणावर गेला. दरम्याने गाडीची चावी तसेच गाडीबाहेर त्याचे बुट आढळून आले मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्याचा शोध घेत असता त्याचा मृतदेह धरणात आढळून आला. मात्र तो धरणात कसा गेला? आदीबाबत प्रश्न निर्माण झाला असून त्याचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे सावर्डे पोलीस स्थानकात त्याची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.