
मराठी शाळा बंद च्या निर्णय विरोधातील शिक्षकांच्या मोर्चा ला मनसेचा पाठिंबा.
*रत्नागिरी जिल्ह्यातील ८३ मराठी शून्य शिक्षकी शाळा बंदीच्या निर्णया विरोधात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयवर निघालेल्या विराट मोर्चा ला आणी मागणीला मनसे ने आपला जाहीर पाठिंबा दर्शवीला आहे. पट संख्येचा निकष लावून स्थलांतर दाखवून अनेक मराठी शाळा बंद करण्याचा घाट महाराष्ट्र सरकार ने घातला आहे. ज्या शाळा बंद होणार तेथील विद्यार्थ्यांनी काय करायचं? त्यांनी शिक्षण कुठे घ्यायचं? किंवा संबंधित शाळेतील शिक्षक काय करणार याबाबत कोणतेही स्पष्ट आदेश न देता सर्वाना अधांतरी ठेवण्याचा सरकार चा उद्देश असावा.
शिक्षकांच्या शिष्ठमंडळा सोबत झालेल्या चर्चे नंतर जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर पुढे म्हणाले की एकीकडे हिंदी सक्ती करून त्या साठी शिक्षक भरती करायच्या तयारीत असलेले सरकार मराठी शिक्षकांच्या बाबतीत मात्र कोणताही विचार करताना दिसत नाहीये. सन्मा. राज साहेबाना याबाबत पत्र देऊन याही विषयी आपण लक्ष घालावे अशी विनंती करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर यांनी सांगितले आहे. या वेळी अरविंद मालाडकर सचिन शिंदे कामगार सेना जिल्हाचिटणीस महेंद्र गुळेकर बाबय भाटकर शहर सचिव गौरव चव्हाण शैलेश मुकादम इत्यादी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते




