खेड शहर परिसरात डेंग्यूच्या साथीचा जोर
पावसाळा सुरू झाला की अनेक साथीडोके वर काढतात खेड शहर परिसरात सध्या डेंग्यूच्या साथीने जोर केला आहे. शहरातील सोनारआळी कासार आणि ब्राह्मण आळी तीनबत्ती नाका या ठिकाणी डेंग्यूच्या साथीचे रुग्ण आढळत आहेत. शहरात विविध भागात अंदाजे दीडशे रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असावी असा अंदाज आहे. असे असूनही जिल्हय़ाचा आरोग्य विभाग मात्र कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही.
www.konkantoday.com