
बीएसएनएल कार्यालयाने थकविले महावितरण कार्यालयाचे साडेचार लाखांचे बिल
रत्नागिरी ः ग्राहकांनी बिले भरली नाहीत तर त्यांची फोनची सेवा लगेचच खंडीत करणार्या बीएसएनएल कार्यालयाचा आता महावितरणची बिले थकविल्याने महावितरणाने विद्युत पुरवठा खंडीत केला आहे. खेड येथील दूरसंचार निगमच्या कार्यालयाने गेल्या दोन महिन्याचे ४ लाख ८३ हजारांचे बिल न भरल्याने महावितरणाने या कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने शहरासह तालुक्यातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली आहे. तसा फलक कार्यालयाबाहेर लावण्यात आला आहे. दूरध्वनी सेवा बंद पडल्याने सरकारी कार्यालयासह बँका व खाजगी मोबाईलधारकांना याचा फटका बसला आहे.
www.konkantoday.com