
भरणे नाका येथे एक्झिट नसल्याने अपघात होण्याची शक्यता – खा. तटकरे
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या कोकणात सर्वत्र मोठय़ा जोराने चालू आहे.खेड भरणे नाका भागात कुठेही एक्झिट मार्ग नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचे खासदार सुनील शेतकरी यांनी निदर्शनास आणून दिले.या संदर्भात सुनील तटकरे यांनी भरणे येथील जागृत श्री देव काय काय मंदिर सभागृहात महामार्गाच्या अधिकाऱयांसमवेत एक विशेष बैठकीचे नियोजन करून महामार्ग चौपदरीकरणात भरणे नाक्याच्या नक्की नियोजन काय याची माहिती भरणे परिसराला नव्हे तर खेड ,दापोली मंडणगड, या तीन तालुक्यातील नागरिकांना व्हावी यासाठी बैठक आयोजित करावी अशी मागणी केली. भरणे ठिकाण जंक्शन असून या ठिकाणी दापोली मंडणगड तालुक्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग आहे.त्या प्रमाणेच मुंबई – रत्नागिरी ,गोवा येथून येणाऱ्या वाहनांना एक्झिट जाता येता नसल्याने फार मोठी अडचण भासणार आहे .
www.konkantoday.com