नाणार रिफायनरी समर्थनार्थ आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळणार ?विरोध करणाऱ्या एकता  भूमिकन्या मंचाची प्रतिमोर्चा तून माघार

नाणार रिफायनरी प्रकल्प प्रकल्पाच्या समर्थनासाठी उद्या रत्नागिरीत मोठे आंदोलन छेडले जाणार आहे शांततेच्या मार्गाने होणार्या आंदोलनाला सर्वस्तरावरून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चिन्ह दिसत आहे या या प्रकल्पाच्या विरोधात असलेल्या एकता भूमीकन्या मंचाने उद्याच्या प्रति मोर्चातून माघार घेतली आहे रत्नागिरीचेपालकमंत्र्यांनी सल्ला दिल्याने आपण सध्या माघार घेत असल्याचे पत्रक त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे
या उलट नाणार समर्थनार्थ छेडणाऱ्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे कोकण विकास समितीमार्फत गेले काही दिवस मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे त्यामध्ये शाळा कॉलेजचे विद्यार्थ्यांपासून कार्यालये अन्य व्यापारी व सामाजिक संस्था यांच्या भेटीगाठी घेऊन या प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर केले जात आहेत यामुळे या ठिकाणी प्रकल्प व्हावा यासाठी मोठे समर्थन मिळत आहे नाणार येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा जिल्ह्याचा विकास व्हावा या भावनेने उद्याच्या मोर्चात अनेक स्तरांवरील लोक सहभागी होणारा असल्याचे दिसत आहे यामध्ये महिला व तरुण वर्गाचाही मोठा सहभाग राहणार आहे
नाणार प्रकल्प समर्थनार्थ आंदोलनाला खुद्द नाणार राजापूर लांजा परिसरातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे खुद्द नाणार परिसरातील प्रकल्पासाठी जागा गेलेले शेतकरी अन्य बाजारपेठेतील व्यापारी व तरुण वर्ग उद्याच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे मारुती मंदिर येथून निघणार्या या मोर्चात हजारो नागरिक व कोकण विकासासाठी जमलेले कार्यकर्ते सहभागी होणार आहेत
या शांततामय आंदोलनाची जय्यत तयारी झाली आहे

नाणार रिफायनरी समर्थनार्थ आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच त्याप्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेणाऱया एकता भूमीकन्या मंचाने प्रतिमोर्चा काढण्याच्या भूमिकेतून माघार घेतली आहे याबाबत मंचाच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री रवींद्र वायकर यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी रिफायनरी हा विषय संपलेला आहे याविषयाला कोणीही कितीही चाळवले तरी तो जिवंत होणार नाही त्यामुळे तुम्ही आपली ताकद वाया घालवू नये असा सल्ला दिल्याच एकता भूमिकन्या मंचाचे म्हणणे आहे पालकमंत्र्यांचे हे म्हणणे पटल्याने आम्ही मोर्चा रद्द केल्याचे मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे मात्र रिफायनरी प्रकल्प परत नाणार येथे रेटण्याचा प्रयत्न झाला त्याला मोठा विरोध करणार असल्याचेही मंचाने जाहीर केले आहे
पोलिसांनी याआधीच मंचाच्या प्रति मोर्चाला परवानगी नाकारलेली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button