एमआयडीसीच्या किमान चाळीस टक्के बांधकाम केले पाहिजे या निर्णयाला उद्योगमंत्र्यांनी दिली स्थगिती
राज्यातील उद्योजकांना महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने किमान ४० टक्के बांधकाम केले पाहिजे अशा प्रकारची अट घातली होती.याबाबत सर्व उद्योजकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.सर्व उद्योजकांचा संघटनांकडून ही जाचक अट रद्द करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली जात होती व तशा प्रकारचे निवेदन उद्योगमंत्र्यांना देण्यात आले होते.लोटे परशुराम उद्योजक संघटनेनेही याबाबतचे निवेदन उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले होते.उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांनी सदर निर्णयाला स्थगिती दिली आहे.सध्या उत्पादनांमध्ये असणाऱ्या उद्योगांना ही अट असणार नाही अशी घोषणा उद्योगमंत्री नामदार सुभाष देसाई यांनी केले.
www.konkantoday.com