आपत्तीच्या घटनांचे फोटो अपलोड करण्यापेक्षा आपद्ग्रस्तांना मदत करा -जिल्हाधिकारी यांचा सल्ला
आपत्तीच्या घटना घडल्यास त्याचे फोटो काढून ते अपलोड करण्याकडे जनतेचा कल असतो, ऐवजी सर्व संबंधितांनी आपदग्रस्तांना मदत करावी असा सल्ला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोशल मीडिया प्रेमी जनतेला दिला.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. तिवरे धरण फुटीच्या आपत्तीत एनडीआरएफच्या जवानांनी बजावलेल्या कार्याचे जिल्हाधिकारी यांनी कौतुक केले. अशा आपत्तीच्या वेळी या जवानां बराेबर मदतीसाठी नागरिकांनी पुढे येणे त्यांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com