अनाधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी चिरे व्यावसायिकाला पंधरा लाखांचा दंड
रत्नागिरी तालुक्यातील लाजूळ येथील चिरे व्यावसायिक रघुनाथ शितप याने परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने तहसीलदार कार्यालयाने पंधरा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे
२००५ साली सहाशे ब्रास चिरा उत्खननाची परवानगी शितप यांना तहसीलदार कार्यालयाने दिली होती. मात्र त्यांनी हे करताना शेजाऱयांच्या जमिनत उत्खनन करून करून मोठा खड्डा निर्माण केला याबाबत शेजाऱयांनी तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केली होती. यावर तहसीलदारानी शितप यांना पंधरा लाख रुपये दंड ठोठावला व शेजारच्या जागेत पाडलेल्या खड्डा भरून देण्याचे आदेशही देण्यात आले.
www.konkantoday.com