स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये २३ वा क्रमांक प्राप्त करणार्या रत्नागिरी नगर परिषदेचा २३ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
रत्नागिरी ः केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेचे अनुशंगाने दरवर्षी सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे सर्वेक्षणात पश्चिम विभागातील नॉन-अमृत प्रवर्गात रत्नागिरी शहराचा गुणानुक्रम २६ वा होता. तर स्वच्छ सर्वेक्षण २०१९ चे सर्वेक्षणात नॉन-अमृत प्रवर्गात राष्ट्रीय पातळीवर रत्नागिरी शहराचा गुणानुक्र्रमांक २३ वा आहे. शहराच्या स्वच्छतेच्या व पर्यायाने स्वच्छ सर्वेक्षणात केलेल्या या कामगिरीबद्दल २३ जुलै २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्कार वितरण होणार आहे.
www.konkantoday.com