मोठा गाजावाजा करत उभारलेला ब्रेक टेस्टिंग ट्रॅक असूनही वापराविना
काही महिन्यांपूर्वीच मोठा गाजावाजा करत चिपळूण पिंपळी येथे ब्रेक टेस्टिंग ट्रॅक चा शुभारंभ करण्यात आला.परंतु अनेक महिने उलटून गेल्यानंतरही शुभारंभ झालेला ट्रक अजूनही वापरण्यात येत नाही आहे.ट्रॅकचा शुभारंभ झाल्यापासून या ठिकाणी अधिकारी हि फिरकले नाहीत. सुमारे ३६ लाख रुपये खर्च करून या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकची उभारणी करण्यात अाली होती.आतापर्यंत उत्तर रत्नागिरीतील लोकांना ब्रेक टेस्टिंगसाठी व पासिंगसाठी रत्नागिरी येथे यावे लागत होते.त्यामुळे उत्तर रत्नागिरीत देखील ब्रेक टेस्टिंग सुविधा उपलब्ध व्हावी अशी लोकांची अनेक वर्षे मागणी होती.शुभारंभ होऊ नये ब्रेक टेस्टिंग ट्रॅक वापरात येत नसल्यामुळे सध्या तरी लोकांना रत्नागिरी येथेच जावे लागत आहे.
www.konkantoday.com