मत्स्य विभाग रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील रिक्त पदे लवकरच भरली जाणार-ना.महादेव जानकर
सावंतवाडी-राज्याच्या मत्स्य व पशुसंवर्धन खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर या संबंधित अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून गेले अनेक वर्षात मत्स्य व पशुसंवर्धन विभागात भरती झाली नव्हती परंतु सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या चार जिल्ह्यातील मत्स्य विभागातील रिक्त पदे येत्या आठवड्याभरात भरण्यात येणार आहे. तसेच एलईडी मासेमारी विरोधात शासनाची भूमिका कठोर असून यामुळे मच्छीमारांचे प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिला.
सावंतवाडी येथे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात जानकर यांनी केसरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार वैभव नाईक,राजन पोकळे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com