पिंपर धरणाशेजारी असलेल्या श्री सोमजाई स्टोन क्रशरचा परवाना रद्द करण्यात यावा ग्रामस्थांची मागणी
पिंपर धरणाशेजारी असलेल्या श्री सोमजाई स्टोन क्रशरचा परवाना रद्द करण्यात यावा असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांना दिले.श्री सोमजाई स्टोन क्रशरच्या सुरुंग स्फोटामुळे धरणाला व परिसरातील घरांना हादरे बसतात. त्यामुळे त्यावर धरणासारखे प्रसंग उद्भवू नये यासाठी त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.या निवेदनात म्हटले आहे की पाटबंधारे उपविभाग चिपळूण यांनी दिलेल्या पाहणी अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की,सदरील स्टोन क्रशर ही पिंपरी धरणापासून काही अंतरावर असल्याने या क्रशरमुळे भविष्यात धोका निर्माण होण्याची भीती आहे.धरणाबरोबर परिसरामध्ये सुमारे १६०० ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीती आहे.क्रशर ठिकाणी खडी तयार करण्यासाठी दगड उत्खननासाठी सुरुंग लावले जातात.त्यामुळे पिंपर परिसरात घरांना स्फोटांमुळे धक्के बसतात धरणासही तीव्र स्वरूपाचे धक्के बसत असून त्यामुळे धोरणास तडे जाऊन धरण फुटण्याची शक्यता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com