बांबू लागवडीमध्ये कुडाळ पंचायत समिती जिल्ह्यात अव्वल
कुडाळ-सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून सन २०१९-२० मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने बहुउपयोगी बांबू लागवडीला विशेष मोहिमेचे स्वरूप दिले आहे. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कुडाळ पंचायत समितीने बांबू लागवडीचे हे आवाहन स्वीकारून आपल्या कामाचा आगळावेगळा ठसा उमटविला आहे. तसेच यात गटविकास अधिकारी विजय चव्हाण, सभापती राजन जाधव व तसेच पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांनी बांबू लागवडीसाठी जिल्ह्यात आघाडी घेतली आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या महत्त्वकांक्षी बांबू लागवडीचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यानंतर कुडाळ तालुक्यासाठी बांबू लागवड लक्षांक १५० हेक्टर असून तालुक्याने ३७४ हेक्टर बांबू लागवडीचे लक्ष्य साध्य केले. या कामगिरीबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मध्ये कुडाळ तालुका अग्रेसर असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तालुक्याचे गटविकास अधिकारी विजय चव्हाण व कृषी विभाग तसेच तालुक्यातील ग्रामसेवक यांचे विशेष अभिनंदन केले.
www.konkantoday.com