शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ३८,९९३ शेतकर्यांना कर्जमाफी
रत्नागिरी ः शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेे अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ३८९९३ शेतकर्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यापोटी ८२ कोटी ९२ लाखाची कर्जमाफी देण्यात आली असून ८२०१ शेतकरी माफीच्या प्रतिक्षेत आहेत. खरीप रब्बी हंगामात झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाहीत. थकबाकीमुळे शेतकर्यांना नव्याने कर्ज मिळत नाही. राज्य शासनाने २०१७ मध्ये थकीत कर्जदारांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली होती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकर्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी, दीड लाखांवरील शेतकर्यांना २५ टक्के किंवा २५ हजारांचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले होते.
www.konkantoday.com