कोकणातील लघु सिंचन प्रकल्पांना तातडीने मंजुरी मिळावी ः आ. सदानंद चव्हाण
रत्नागिरी ः कोकणामध्ये अनेक ठिकाणी लघु सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण होवूनही त्यांना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. यासाठी चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांच्या मागणीनुसार मंत्रालय जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी विशेष बैठक घेतली. यावेळी आ. चव्हाण यांनी पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता आवश्यक व शक्य असणार्या ठिकाणी साठवण तलाव, पाझर तलाव अशा योजनांना मंजुरी मिळणेे आवश्यय असल्याचे निदर्शनास आणून दिले.
www.konkantoday.com