
महामार्ग अधिकार्याला पुलाला बांधल्याप्रकरणी नगराध्यक्ष वैभव खेडेकरांसह दोन जणांचे जामीन अर्ज फेटाळले
खेड ः राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या दोन अधिकार्यांना पुलाला बांधल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नगराध्यक्ष वैभव खेडेकर, विश्वास मुधोळे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळले आहेत. या दोघांना १९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.