
तब्बल अकरा तासांनंतर पुरामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका
कोकणात पडणाऱया मुसळधार पावसामुळे खेड शहरात वाहणाऱ्या सुसेरी नदीला सोमवारी सकाळी पूर आला.शेतांमध्ये गेलेले दोन कुटुंब या पुरामध्ये अडकले.तब्बल अकरा तास लोक पुरामध्ये अडकलेले होते.स्थानिक युवकांच्या मदतीने अकरा तासांनंतर पाणी ओसरल्यावर त्यांना बाहेर काढण्यात आले.
सकाळी सहा वाजता अडकलेल्या लोकांची सुटका होण्यासाठी सायंकाळी पाच वाजले,त्यामुळे जवळपास अकरा तासांहून अधिक काळ हे सहा लोक पूर परिस्थितीमध्ये झाडांचा आधार घेऊन टिकून राहिले.यामध्ये एका महिलेचाही सहभाग होता.खेड शहरातील कासार आळी परिसरातील साळवी आणि कावणकर असे हे कुटुंब होते.
www.konkantoday.com