
जिल्ह्यात १५ जुलै ते २९ जुलै दरम्यान मनाई आदेश
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहेत.
दि. १५ जुलै २०१९ रोजी १ वाजल्यापासून ते दि. २९ जुलै २०१९ रोजी जिल्ह्यात प्र्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. वरील कालावधीत जिल्ह्यामध्ये नाणार प्रकल्प समर्थकांच्या तसेच त्याला प्रत्युत्तर म्हणून नाणार प्रकल्पविरोधकांचा मोर्चा रत्नागिरीत आयोजित करण्याचे योजिले आहे. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणुका तसेच निवडणूक प्रचार सभा यांचे आयोजन ठरवायचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.