तिवरे धरण येथे ‘एसआयटी’ मार्फत चौकशी सुरू
चिपळूण तिवरे येथे धरण फुटून झालेल्या अपघातांमध्ये २३ हुन अधिक जणांचा बळी गेला.या धरणाच्या गळतीविषयी ग्रामस्थांनी आधीच प्रशासनाला माहिती दिल्याचा दावा केला होता.त्यामुळे हा आपघात प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तर नाही ना झाला? असा सवाल उपस्थित होत होता.या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी व्हावी यासाठी सरकारने एसआयटी समिती स्थापन केली.
या उच्चस्तरीय समितीने सोमवारी तिवरे येथे जाऊन पाहणी केली.समितीने अपघाताविषयी ग्रामस्थांशी देखील चर्चा केली.या समितीने ज्या ठिकाणी धरण फुटले त्या ठिकाणाची पाहणी केली.धारणा बाहेरील व आतील भागाची तसे जेथुन घरे वाहून गेली त्या ठिकाणाची सुद्धा या समितीने पाहणी केली.या समितीमध्ये जलसंधारण विभागातील मुख्य अभियंता, रत्नागिरी जिल्हाधिकारी,जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा समावेश आहे.
सर्व तांत्रिक बाजू तपासून ही समिती येत्या दोन महिन्यांमध्ये आपला अहवाल शासनाला कळवणार आहे.