नितेश राणे यांना मंत्रिमंडळात घ्यावे ,सिंधुदुर्ग भाजपाची मागणी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातुन भाजपचे आमदार असलेल्या नितेश राणे यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे अशा मागणीचा ठराव आज कणकवली येथील भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल ही त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष जठार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.
www.konkantoday.com