
माळनाका येथील कारच्या धडकेत दोन जण जखमी
रत्नागिरी ः रत्नागिरी शहरातील माळनाका येथे मध्यवर्ती बँकेसमोर अज्ञात कारने मागून धडक दिल्याने दुचाकीवरील मनाली घाणेकर व अथर्व घाणेकर हे दोघेजण जखमी झाले. रविवारी सायंकाळी ते माळनाका येथून जात असता हा अपघात घडला. कारचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. या दोघा जखमींवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.