
तिवरे धरण दुर्घटना शोधमोहीम थांबवली
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत वाहून गेलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गेले काही दिवस एनडीआरएफकडून सुरू असलेली शोध मोहीम आता थांबविण्यात आली आहे. या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह सापडला आहे मृतदेह बेपत्ता असलेल्या सुशीला घाडवे हिचा आहे की नाही याची खात्री करून घेण्यात येत आहे .या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या चिमुकल्याचा मृतदेह मात्र अद्याप मिळाला नाही बेपत्ता झालेल्या २२ जणा पैकी २१मृतदेह सापडले आहेत.
www.konkantoday.com