
गैरसमजातून भावाच्या डोक्यात मारली कुदळ
रत्नागिरी ः दापोली साखरोळी येथील विठ्ठल परशुराम तांबे याचे त्याचा भाऊ मधुकर तांबे याच्याशी जागेवरून वाद आहे. यातील फिर्यादी परशुरराम हा जेवण आटपून चुळ भरत असता मधुकर याने परशुराम हे आपल्याकडे पाहून थुंकले असा गैरसमज करून घेवून रागाच्या भरात त्यांनी धक्काबुक्की केली व हातात असलेली कुदळ परशुराम याच्या डोक्यात मारली. त्यामुळे तो जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी दापोली रूग्णालयात दाखल करण्यात आले