
संकल्प युनिक फाउंडेशन यांचे विद्यमाने व खान फाउंडेशन यांचे वतीने शिलाई मशीन चे वितरण
रत्नागिरी:- गेली अनेक वर्षे गरीब महिलांना वैद्यकीय, शिक्षण,सांसारिक वस्तू आदी मोफत वितरित करणारी रत्नागिरी येथील खान फाऊंडेशन ने या वर्षी १० गरजू महिलांना शिलाई मशीन चे वाटप केले.याकामी आपणास खान ब्रदर्स यांनी खूप सहकार्य केल्याचे खान फाउंडेशन चे उपाध्यक्ष एजाज खान यांनी सांगितले.
हाँटेल महाराष्ट्र च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे नियोजन *संकल्प युनिक फाउंडेशन, शाखा रत्नागिरी* यांनी केले होते.या प्रसंगी खान फाउंडेशन चे सचिव बावा खान(बावा टेलर),खजिनदार सादीक खान,रियाज खान,इम्तियाज खान,नानू खान आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.