
दापोलीत घरफोडी टीव्ही व गॅस सिलेंडर चोरला
दापोली तालुक्यातील खेर्डी देऊळवाडी येथील सतीश केळकर यांचे बंद घर अज्ञात चोरटय़ांनी फोडले. केळकर हे मुंबईला असतात त्यांनी देखरेखीसाठी माणूस ठेवला असून हा माणूस साफसफाई करून गेल्यानंतर रात्री अज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील टीव्ही व गॅस सिलेंडर लांबविला.




