तोतया पोलिस बनून एक लाखाची रक्कम लुटली आरोपीला अटक
आपण पोलीस आहोत आपणाला तुझी बॅग तपासायची आहे असे सांगून एका तरुणाला धमकी देत एक लाखाची रोकड लुटल्याप्रकरणी शाहिद मुजावर धनजी नाका याला पोलिसांनी अटक केली आहे.
यातील फिर्यादी अमित पाटील राहणार सोलगाव भंडारवाडी राजापूर हे रत्नागिरी शहरात कामानिमित्त आले होते हे पटवर्धन स्कूल जवळून जात असता त्याला आरोपी शाहिद यांनी अडवले.आपण पोलीस आहोत पुढे एका ज्वेलरचे दुकान फुटले आहे, त्यामुळे तुझी बॅग तपासायची आहे असे सांगून त्याला एका बाजूला नेले तेथे त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडून एक लाख रुपये रक्कम लुटून नेली. घाबरलेल्या अमितने नंतर घरच्यांना प्रकार सांगितला त्यांनी नंतर पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी तपास करून शाहिद मुजावर याला अटक केली.