![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2019/07/konkantoday-logo-14.jpg)
चिपळुणात कॉलेज विद्यार्थ्यांनी बिअर शॉपी फोडून मजा केली
चिपळूण शहरातील परशुराम नगर परिसरात असलेली बिअर शॉपी फोडल्याची घटना नुकतीच घडली. या दुकानातून बिअरचे ट्रे व लॅपटॉप चोरीला गेला. या प्रकरणी धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांनी यात संशयितांना ताब्यात घेतले आहे. हे सगळे विद्यार्थी असून त्यातील काहीजण बारावी तर काहीजण इंजिनिअरिंग कॉलेजला शिकत आहेत.