गोवा पोलिसांच्या सातार्डा येथील तपासणी चौकीत घुसला कंटेनर
भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील गोवा पोलिसांच्या सातार्डा पोलीस तपासणी चौकीत कंटेनर घुसून अपघातग्रस्त झाला. पोलीस कर्मचारी चौकीत नसल्याने मोठा अनर्थ टळला. कंटेनर चालक दारूच्या नशेत असल्यानेच अपघात झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामध्ये कंटेनर चालक तब्बल एक तास कंटेनरमध्ये अडकून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे.