
गुहागर विधानसभेच्या जागेवर भाजपचा प्रबळ दावा
गुहागर विधानसभा मतदारसंघावर भाजपने प्रबळ दावा केला आहे. त्यादृष्टीने भाजप कार्यकर्त्यांनी आतापासूनच जोर लावला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री नामदार चंद्रकांत पाटील हे काल गुहागरच्या खासगी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली .या बैठकीला माजी आमदार विनय नातू ,माजी आमदार बाळ माने व भाजपचे तालुका प्रमुख सुरेश सावंत अादी पदाधिकारी उपस्थित होते. या मतदारसंघातून भाजपचे विनय नातू हे इच्छुक असून भाजप शिवसेनेच्या वादात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला होता. त्याआधी हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. आता हा मतदारसंघ भाजपकडे यावा यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी केली आहे.नामदार पाटील यांच्या दौऱ्यामुळे या मागणीला जोर मिळणार आहे.