
सिने क्षेत्रातील कलाकारांना आणि तंत्रज्ञांना म्हाडा मार्फत स्वस्तात घर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आदेशानुसार सिनेमा आणि टिव्ही मालिका क्षेत्रात काम करणारे कलाकार आणि तंत्रज्ञांना आता म्हाडा मार्फत स्वस्तात घरं उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आज शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत कलाकार आणि तंत्रज्ञही उपस्थित होते. बैठकीत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात राहणाऱ्या कलाकारांना त्यांच्या जिल्हा विभागातच म्हाडाची घरं उपलब्ध करण्यात येतील. तर मुंबई एमएमआर रिजनमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना आणि तत्रज्ञांना विरारमध्ये म्हाडाची घरं उपलब्धं करण्यात येतील असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितलं. या योजनेमुळे बॅकस्टेज कलाकार आणि तंत्रज्ञांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सांगितलं.
बैठकीला सरचिटणीस संग्राम शिर्के, सुशांत शेलार,दिगंबर नाईक, नितीन घाग,विद्या खटावकर,राणी गुणाजी,कलाकार,आणि म्हाडाचे अधिकारी हजर होते.