
नियम तोडणार्या रिक्षाचालकांविरूद्ध वाहतूक पोलिसांची कडक मोहीम
रत्नागिरी ः रिक्षा चालकांकडून अनेकवेळा नियमांची पायमल्ली होत असून नो पार्किंगमध्ये रिक्षा उभी करणे, बॅच नसणे, ड्रेसकोड नसणे, लायसन नसणे अशा गोष्टी रिक्षाचालकांकडून घडत असून त्याविरूद्ध आता वाहतूक विभागाने कडक कारवाईचे धोरण स्विकारले आहे. वाहतूक पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी १२५ रिक्षा चालकांवर कारवाई करून त्यांना दंड ठोठावला आहे. अनेकवेळा रिक्षा चालकांकडून भाड्यापेक्षा जास्त रक्कम घेतली जात असल्याच्याही नागरिकांच्या तक्रारी आहेत.