चिपळुणातील प्लास्टिक अंडी प्रकरणात प्राथमिक तपासणीत तरी तथ्य नाही
चिपळूण शहरात दोन दिवसांपूर्वी प्लॅस्टिकची अंडी मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते दोन दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या अंड्यांमध्ये प्लॅस्टिक सारखे पदार्थ आढळल्याची तक्रार आल्यानंतर या प्रकाराची दखल अन्न प्रशासन विभागाने घेतली या विभागाचे अधिकारी प्रशांत गुंजाळ व नमुना सहायक लांजेकर यांनी संबंधिततक्रार असलेल्या चिपळूणमधील स्टॉलची तपासणी केली तसेच तेथे असलेल्या असलेल्या अंड्यांचे नमुने घेतले यातील काही अंडी फोडून भाजण्यात आली परंतु त्यामध्ये प्लॅस्टिक सारखा पदार्थ आढळून आला नाही तरी देखील अंड्यांचे नमुने पुढील निरीक्षणासाठी प्रयोगशाळा पुणे येथे पाठवण्यात आले आहेतपुढील कारवाई प्रयोगशाळेचे परिणाम आल्यानंतर करण्यात येईल असे स्पष्टीकरण सय्यद हाश्मी सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन रत्नागिरी यांनी दिले आहे