
गोवळकोट भागात गुरांची वाहतूक करणारा ट्रक पकडला
चिपळूण शहरातील गोवळकोट बायपास रस्त्याने गुरांची वाहतूक करणारा ट्रक ग्रामस्थांनी पकडला चालकाने ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ग्रामस्थांनी त्यांना मारहाण केली या गाडीत असणारा सचिन सावंत याला ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे ही गुरे कोठे नेण्यात येत होती हे अद्याप उघड झालेले नाही