सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संजय कदम यांची शिक्षा अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली
रत्नागिरी ः २००५ साली शासकीय कामात अडथळा व सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आ. संजय कदम यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर २०१५ मध्ये थेट दिवाणी न्यायालयाने कदम यांना एक वर्ष कारावास व दंड अशी शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर याबाबत खेड अतिरिक्त जिल्हा स्तर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याचा निकाल लागून न्यायालयाने दिवाणी न्यायालयाने दिलेली एक वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला.