वरिष्ठ न्यायालयात न्याय मागणार आमदार संजय कदम
न्यायालयाने सुचवलेल्या शिक्षेच्या आदर करून आम्ही योग्य न्यायासाठी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहे निश्चितच आम्हाला न्यायदेवता न्याय देईल असा विश्वास आमदार संजय कदम यांनी व्यक्त केला
२००५साली अतिवृष्टी चा फटका बसलेल्या लोकांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी कदम व त्यांच्या सहकाऱयांनी प्रांताधिकारी यांच्याकडे मोर्चा नेला होता त्यावेळी तोडफोड आणि शासकीय कामात अडथळा आणला या आरोपावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता प्रकरणी दिवाणी न्यायालयाने एक वर्ष कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली होती हा निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने काल कायम ठेवला त्यावर कदम यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली