रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती कारागृहात वृक्षारोपण
वृक्ष व वन्यजीव संवर्धनाकरीता राज्यशासनाने जुलै महिन्यात हाती घेतलेल्या तेहतीस कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते शुक्रवारी रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती कारागृहात वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा कारागृहातील कैद्यांनीही वृक्षारोपणाच्या कायॅक्रमात सहभाग घेऊन वृक्षारोपण केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, वन अधिकारी विजयराज सुवेॅ, शिवसेना पक्षाचे जिल्हा सह संपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक आदि अधिकारी तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com