
प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या माध्यमातून घरे देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सोलापूर – पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्य शासन सकारात्मक असून राज्यातील प्रत्येक जिल्हयातील पत्रकारांसाठी म्हाडाच्या विशेष योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सोलापूर येथील श्रमिक पत्रकारांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात 238 सदनिका बांधकामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण व वृक्षारोपण करण्यात आले.