पदयात्रेच्या माध्यमातून पाच वर्षांत केलेले काम मतदारांपर्यंतनेणार -आमदार उदय सामंत
गेल्या पाच वर्षांत आपण आमदार निधीसह शासनाच्या विविध योजना याद्वारे मिळालेला निधी मतदार संघात आणला आहे त्याचा लेखाजोगा करणारा अहवाल आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रकाशित करणार आहोत त्यानंतर तालुक्यात विविध भागात पदयात्रा काढून या अहवालामार्फत आपण मतदारांपर्यंत पोचणार आहोत अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली.