जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी
रत्नागिरी ः कोकणात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांंच्या इमारतीची अवस्था जीर्ण झाली आहे. तरी देखील धोका पत्करून या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. नुकत्याच एका शाळेत छप्पर कोसळण्याचा प्रकारही घडला होता. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा, शासनमान्य खाजगी शाळा व महाविद्यालये, तसेच शासकीय इमारती यांचे स्ट्रक्चरल ऑडीट तात्काळ करावे अशी मागणी महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशनचे कोकण विभागीय संघटक विशाल शेले यांनी कोकण आयुक्तांकडे केली आहे.