
खेडमधील नारिंगी नदीला पूर, खेड-दापोली मार्ग ठप्प
रत्नागिरी ः कोकणात गेले काही दिवस मुसळधार पावसाने जोर केला असून खेड, दापोली मार्गावरील नारिंगी नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. काल मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्ग ठप्प झाला होता. तो सध्या सुरू करण्यात आला आहे. राजापुरातही काल पाणी भरले होते.