
सिंधुदुर्ग दोडामार्ग येथे डोंगर खचला
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली येथे आज सकाळी ८.४५ वाजता जिल्हा नियंत्रण कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार, मांगेली कुसगेवाडी येथे डोंगर खचून माती रस्त्यावर आलेली आहे, तसेच झाडे देखील पडलेली आहेत, त्यामुळे रस्ता मोठ्या वाहनांसाठी बंद झालेला आहे. सदर माहिती तहसीलदार दोडामार्ग यांना जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आलेली आहे. तहसीलदार दोडामार्ग घटनास्थळी पाहणीसाठी निघालेले आहेत.